Mumbai, फेब्रुवारी 1 -- Maharashtra GBS News: जीबीएस हा आजार रुग्णांच्या जीवावर उठला असून आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. जीबीएस आजारावर नियंत्रण मिळण्यासाठी आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली. राज्यातील जीबीएस रुग्णांची संख्या १४० वर पोहोचली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.

जीबीएसच्या या १४० संशयित रुग्णांपैकी तब्बल ९८ जणांची जीबीएस चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये मनपा क्षेत्रातील २६, मनपा क्षेत्रातील नव्याने समाविष्ट झालेल्या गावांतील ७८, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील १५, पुणे ग्रामीणमधील १० आणि इतर जिल्ह्यातील ११ रुग्णांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेले १८ ज...