Mumbai, फेब्रुवारी 11 -- Garud Puran: गरुड पुराण हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा ग्रंथ आहे. हे पुराण १८ पुराणांपैकी एक आहे. या ग्रंथात भगवान विष्णूभक्तीचे सविस्तर वर्णन करण्यात आलेले आहे. शास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर या ग्रंथाचे वाचन केले जाते. गरुड पुराणात व्यक्तीच्या जीवनाशी निगडित अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की, व्यक्तीच्या काही चुका सौभाग्याचे दुर्दैवात रूपांतर करतात. या चुका टाळून किंवा गरुड पुराणात सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार मार्गक्रमण केल्यास व्यक्तीला सुख प्राप्त होते असे म्हटले जाते. जाणून घेऊ या, अशा कोणत्या गोष्टी आहे ज्या टाळणे आवश्यक मानले गेले आहे. काय सांगते गरुड पुराण.

गरुड पुराणानुसार माणसाने कधीही पैशाचा अभिमान बाळगू नये. अहंकारामुळे माणसाची बौद्धिक क्षमता कमी होते. ज्यामुळ...