Mumbai, फेब्रुवारी 17 -- Garud Puran : हिंदू धर्मातील १८ महापुराणांपैरी गरुड पुराण हे एक महत्त्वाचे पुराण आहे. या पुराणात विविध प्रकारच्या पापांची मृत्यूनंतर नरकात पाठवणी झाल्यानंतर विविध प्रकारची शिक्षा मिळते असे सांगितले गेले आहे. मात्र, जे लोक लैंगिक अत्याचार करतात किंवा महिलांना वाईट नजरेने पाहतात किंवा महिलांचे शोषण करतात अशांना मृत्यूनंतर काय शिक्षा मिळते याचे वर्णनही गरुड पुराणात आढळते. महिलांवर अत्याचार करणारे जेव्हा नरकात जातात तेव्हा अशा व्यक्तीला उकळत्या तेलात टाकले जाते. त्याच प्रमाणे अशा व्यक्तीच्या अंगावर गरम वितळलेले लोखंड ओतले जाते, असे वर्णन गरुड पुराणात आढळते.

जे पुरुष परक्या स्त्रीवर नजर टाकतात किंवा तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या आत्म्याला नरकात जावे लागते आणि गरम धगधगत्या लोखंडी खांबाला बिलगून रहाव...