Mumbai, फेब्रुवारी 5 -- Garud Puran: गरुड पुराण हिंदू धर्मातील १८ महापुराणांपैकी एक मानले जाते. गरुड पुराणात सांगितलेल्या नीती आपले भविष्य घडविण्याबरोबरच आपले जीवन सोपे करतात. गरुड पुराणात जीवनापासून मृत्यूनंतरच्या परिस्थितीचे वर्णन करण्यात आलेले आहे. गरुड पुराणात अशा लोकांविषयी सांगण्यात आले आहे, ज्यांचा सहवास टाळणे, त्यांच्यापासून दूर राहण्यातच व्यक्तीचे भले असते. गरुड पुराणानुसार जाणून घेऊ या, आपले नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने कोणत्या पाच प्रकारच्या लोकांपासून अंतर ठेवावे किंवा त्यांच्या पासून दूर राहावे.

गरुड पुराणानुसार नकारात्मक विचार असलेल्या लोकांना दूर ठेवावे. अशी माणसे यशात नेहमीच अडथळा ठरतात. अशावेळी जर तुमच्या आजूबाजूला नकारात्मक विचारांचे लोक राहत असतील तर तुम्ही त्यांच्यापासून अंतर ठेवावे.

काही लोक अनेक गोष्टीचा द...