भारत, फेब्रुवारी 4 -- Garud Puran: गरुड पुराण हे १८ पुराणांपैकी एक आहे. गरुड पुराणात एकूण १९ हजार श्लोक आहेत. यांपैकी तब्बल ७ हजार श्लोक हे माणसाच्या जीवनाशी संबंधित आहेत. यात स्वर्ग, नरक, रहस्य, नीती, धर्म, ज्ञान अशा गोष्टींचा उल्लेक आहे. आज आपण मृत्यूनंतर व्यक्तीचे काय होते याबाबत गरुड पुराण काय सांगते हे पाहणार आहोत.

गरुड पुराण वाचल्यावर तुम्हाला मृत्यूबाबत आणि मृत्यूनंतरच्या जीवनाबाबत बरीच माहिती मिळते. यात मृत्यनंतर आत्म्याचा प्रवास कसा होतो याचे वर्णन करण्यात आलेले आहे. मृत्यू, मृत्यूनंतरचे जीवन, नरक, स्वर्ग, पाप अशा बाबींवर गरुड पुराणात चर्चा करण्यात आलेली आहे. या पुराणानुसार, व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिचा आत्मा यमलोकात पाठवला जातो. तेथे त्याच्या कर्माचे विश्लेषण केले जाते. त्यानुसार त्या व्यक्तीला पुढील प्रवासासाठी पाठवले जाते असे ...