भारत, फेब्रुवारी 21 -- Garud Puran: सनातन धर्मातील १८ पुराणांपैकी एक असलेल्या गरुड पुराणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यात भगवान विष्णूचा महिमा सविस्तर सांगितला आहे. गरुड पुराणात केवळ मृत्यूनंतरच्या जीवनाविषयी म्हणजेच परलोकाच्या जीवनाविषयी च नव्हे तर मानवी जीवन सुखी करण्याविषयीही सांगितले आहे. पुस्तकातील एका श्लोकात असे नमूद केले आहे की, ज्यामुळे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचते आणि त्यासोबतच स्त्रियांनी काय टाळावे हे सांगितले आहे.

गरुड पुराणानुसार स्त्रीने आपल्या पतीपासून जास्त काळ दूर राहू नये. म्हणजेच कोणत्याही स्त्रीने अतिवियोग टाळला पाहिजे. त्यामुळे कौटुंबिक जीवनात महिलेला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सुरक्षित आणि सन्मानाने जीवन जगण्यासाठी पतीसोबत राहणे चांगले.

गरुड पुराण सांगते की, स्त्री-पुरुष दोघांनीही चांगल्या व्यक्तींशी मैत्...