Mumbai, एप्रिल 12 -- Gajanan Kirtikar on ED : ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स या केंद्रीय तपास यंत्रणांकडून होणाऱ्या कारवायांवरून देशातील विरोधी पक्ष सातत्यानं मोदी सरकारवर टीकेची झोड उठवत असतात. मात्र, आता भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार गजानन कीर्तीकर यांनीच ईडी कारवायांवर संताप व्यक्त केला आहे. आता बस्स झालं,' असं कीर्तीकर यांनी सुनावलं आहे.

गजनान कीर्तीकर हे उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. ते शिंदे गटात असून त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर हे ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत. ठाकरेंनी अमोल यांनाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळं कीर्तीकर यांनी माघार घेतली आहे. आता शिंदे गटाला तिथं उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा: हातकणंगले मतदारसंघात महायुतीचे टेन्शन वाढणार; आमदार प्रकाश आवाडेही लोकस...