Gadchiroli, फेब्रुवारी 2 -- Gadchiroli Naxal Attack : गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहेत. काही दिवसांपासून नक्षलवादी हे सामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहेत. भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुकराम महागु मडावी (वय ४६) यांची शनिवारी रात्री त्यांनी निर्दयीपणे हत्या केली आहे. नक्षलवाद्यांनी त्यांना घरातून बाहेर फरफट आणले. तसेच त्यांची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

सुकराम महागु मडावी हे भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती होते. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. शनिवारी रात्री नक्षलवादी हे मडावी यांच्या घरात घुसले. त्यांनी त्यांना फरफटत मैदानी भागात नेले. या ठिकाणी त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या घटनेमुळे गावात व जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नक्षलवाद्यांनी मृतदेहाजवळ पत्रक फेकले असून त्यात ...