भारत, जुलै 30 -- ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. पण फ्रेंडशिप डे साजरा करण्याची सुरुवात कोणी केली माहित आहे का? मैत्रीचा एक दिवस असावा असं कुणाला वाटलं? जेव्हा प्रत्येकजण आपल्या मित्रांसोबत आपली मैत्री साजरी करतो. भारत आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो, तर अमेरिकेत ३० जुलैला आंतरराष्ट्रीय मैत्री दिन साजरा केला जातो.

काय आहे फ्रेंडशिप डे चा इतिहास?

फ्रेंडशिप डेची कल्पना सर्वप्रथम जॉयस हॉल यांनी १९५८ मध्ये दिली होती. जॉयस हॉल हॉलमार्क कार्ड्सचे संस्थापक होते आणि मित्रांमधील बंधाने प्रेरित होते. ज्यानंतर त्याच्या मनात विचार आला की, मित्रांनी आपली मैत्री आणि प्रेम वाटून सेलिब्रेशन करावे. मिस्टर हॉलची ही कल्पना लोकांना आवडली आणि हळूहळू अधिकाधिक लोक फ्र...