Navi Mumbai, एप्रिल 26 -- Seawoods Flamingoes News: नवी मुंबईच्या सीवूड्सजवळील पाणथळ जागांमध्ये एकूण १२ फ्लेमिंगो जखमी अवस्थेत आढळून आले. यातील पाच फ्लेमिंगोचा मृत्यू झाला आहे. तर, उर्वरित सात जणांवर उपचार सुरू आहेत. एकाच वेळी १२ जखमी फ्लेमिंगो आढळल्याने पक्षीप्रेमी आणि पर्यावरणप्रेमी सखोल चौकशीची मागणी करत आहेत. ठाण्यातील वाइल्डलाइफ वेल्फेअर असोसिएशन या स्वयंसेवी संस्थेची मदत घेण्यापूर्वी मॉर्निंग वॉक करणाऱ्यांना पाणथळ जागेत फ्लेमिंगो जखमी अवस्थेत पडलेले दिसले.

एवढ्या फ्लेमिंगोला संशयास्पद रित्या इजा होण्याची ही पहिलीच वेळ आहे, अशी माहिती पक्षीप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्या रेखा संकला यांनी दिली. गेल्याच आठवड्यात तीन पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. तर, एक जखमी झाला होता. पक्ष्यांच्या मृत्यूचे गूढ आणि जखमांचे कारण शोधण्याची मागणी केली जात ...