Goregaon, नोव्हेंबर 30 -- गोरेगाव : येथील दिंडोशी आयटी पार्कच्या मागील भागातील जंगलात मंगळवारी मध्यरात्री भीषण आग लागली. या घटनेत मोठ्या क्षेत्रावरील वनसंपत्ती जळून खाक झाली. आग कशामुळे लागली हे समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

जंगल परिसरात आग लागलीय तो परिसर हा संजय गांधी नॅशनल पार्कचा एक भाग आहे. जंगलातून मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ दिसू लागले होते. त्यामुळे या घटनेची माहितीमिळाली. या आगीत या परिसरातील अनेक झाडे जळून खाक झाली आहेत. घटनेनंतर अग्निशामक दलाचे सात बंब हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या परीसारात बिबट्या, मोर, वानर, हरण असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव आहेत. ...