Mumbai, फेब्रुवारी 10 -- Filmy Nostalgia Kissa : बॉलिवूड हॉरर चित्रपटांचा विचार केला तर रामसे ब्रदर्सचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाताच येत नाही. रामसे ब्रदर्सचा १९८८ साली आलेला 'विराना' हा चित्रपट आजही भारतीय हॉरर सिनेमातील सर्वाधिक चर्चेत असलेला चित्रपट मानला जातो. पण चित्रपटाची मुख्य अभिनेत्री जॅस्मिन धुन्ना या चित्रपटानंतर कुठे गायब झाली, हा मोठा प्रश्न अजूनही कायम आहे. अभिनेत्री बेपत्ता होण्याबाबत वेगवेगळे कयास बांधले गेले. काहींच्या मते ती जिवंत असून अमेरिकेत राहते. तर काहींचे म्हणणे आहे की, अभिनेत्री आपली ओळख बदलून मुंबईतील वर्सोवा येथे राहत आहे.

'विराना' या चित्रपटामध्ये जॅस्मिन मुख्य नायिका होती. या चित्रपटात ती एका भीतीदायक, पण अतिशय सुंदर नायिकेच्या भूमिकेत दिसली होती. चित्रपटाची ही नायिका आत्म्याच्या प्रभावाखाली असल्याचे दाखवण्...