Mumbai, जानेवारी 28 -- Bollywood Nostalgia Kissa : एखादा बॉलिवूड चित्रपट बनवला जातो, तेव्हा त्यावर पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो. निर्माते आपले कोट्यवधी रुपये चित्रपटांवर लावतात, मात्र काहीवेळा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होतात. तर, काही चित्रपट निर्माते कमी बजेटमध्येही चित्रपट बनवून प्रचंड नफा कमावतात. सध्याच्या काळात शाहरुख खान ब्लॉकबस्टर हिट चित्रपट देत आहे. परंतु, सलमानचे चित्रपट अपेक्षेप्रमाणे काम करत नाहीत. पण, आज आम्ही तुम्हाला सलमान खान आणि शाहरुख खानच्या अशा एका चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो केवळ ६ कोटींच्या बजेटमध्ये बनला होता आणि त्याने निर्मात्यांना रेकॉर्डब्रेक नफा कमावून दिला होता. त्यांचा हा चित्रपट मोठा ब्लॉकबस्टर हिट ठरला होता.

विशेष म्हणजे, आज आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलतोय त्या चित्रपटात नुकतीच किन्नर आखाड्याची महामंड...