Mumbai, जानेवारी 29 -- Filmy Nostalgia Kissa : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार त्यांच्याकडे आलेले चित्रपट नाकारतात आणि टेक चित्रपट पुढे जाऊन तूफान हिट होतात. अनेक बड्या कलाकारांसोबत देखील असं घडतं. असंच काहीस बॉलिवूडच्या एका चित्रपटासोबत घडलं आहे. हा चित्रपट सुरुवातीला शाहरुख खान, हृतिक रोशन आणि अभिषेक बच्चन यांना ऑफर करण्यात आला होता. मात्र, या तिन्ही कलाकारांनी हा चित्रपट नाकारला. मात्र, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर इतका गाजला की, आजही लोक तो आवडीने पाहतात.

या चित्रपटाची कथा अतिशय तगडी होतीच, याशिवाय त्या चित्रपटातील गाणीही खूप गाजली. या गाण्यांना लोकांनी भरपूर प्रेम दिले. या चित्रपटाचे नाव आहे 'रंग दे बसंती'. २००६ मध्ये दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी 'रंग दे बसंती' हा चित्रपट बनवला होता. या चित्रपटासाठी त्यांनी प्रथम शाहरुख खानशी संपर...