Mumbai, फेब्रुवारी 3 -- Bollywood Filmy Nostalgia : रोमान्स किंवा अॅक्शन असलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतात. प्रेक्षक अशा चित्रपटांना विशेष पसंती देताना दिसतात. पण, असे काही चित्रपट देखील बनले आहेत ज्यात ना ॲक्शन होती, ना कुठलाही खलनायक, पण केवळ कथेच्या जोरावर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली होती. काही चित्रपटांचे स्वरूप ठरलेले असते. सुरुवातीला नायक आणि नायिकेची एंट्री होते, दोघे प्रेमात पडतात आणि नंतर कथेत खलनायकाचा प्रवेश होतो आणि मग जबरदस्त हाणामारी होते. पण, असेही काही चित्रपट आहेत, ज्यात कोणतेही ॲक्शन आणि रक्तपात नसताना देखील या चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवले आहे. १३ वर्षांपूर्वी असाच एक चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता आणि या चित्रपटाने पुरस्कारही जिंकले होते. त्या चित्रपटाचे नाव 'बर्फी' आहे.

कॉम...