Mumbai, जानेवारी 31 -- Salman Khan-Sanjay Dutt Movie : बॉलिवूड सलमान खान आणि अभिनेता संजय दत्त यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यांचे अनेक सिनेमे प्रेक्षकांनाही आवडले होते. संजय दत्त आणि सलमान 'चल मेरे भाई' आणि 'साजन'सारख्या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. पण, तुम्हाला माहीत आहे का, संजय दत्त आणि सलमान खान यांचा एक असा चित्रपट आहे, जो कधीच प्रदर्शित झाला नाही. संजय दत्त आणि सलमान खान यांच्या या चित्रपटाची खूप चर्चा झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिवंगत दिग्दर्शक मुकुल आनंद यांनी केले होते. या चित्रपटाचे शूटिंग देखील झाले होते. मात्र, हा चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही.

तुम्ही चित्रपटाचे नाव ओळखले का? नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो. या सिनेमाचं नाव 'दस' होतं. 'दस' हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट होता. संजय दत्त आणि सलमान ...