भारत, नोव्हेंबर 25 -- फिफा विश्वचषक स्पर्धेत ब्राझीलने आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. गुरुवारी दोहा येथे सर्बियासोबत झालेल्या सामन्यात ब्राझीलने २-० ने विजय मिळवला. या विजयासह ब्राझीलने सहाव्या विजेतेपदाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. या सामन्यात ब्राझीलच्या रिचार्लीसनने अफलातून गोल केला. फिफाने या गोलचा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

FIFA WC 2022: जिथं जातात तिथं मनं जिंकतात, जपानी लोकांच्या 'या' कृतीचं होतंय जगभरातून कौतुक

व्हिनिशियस ज्युनियरचा गोलचा प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर ७३व्या मिनिटाला रिचार्लीसनने गोल केला. व्हिनिसियसने सर्बियन खेळाडूंपासून चेंडू आपल्या ताब्यात घेत रिचार्लीसनकडे पास केला. या पासवर रिचार्लीसनने अप्रतिम अॅक्रोबॅटिक सिझर किकने गोल केला. तत्पूर्वी, रिचार्लीसनने ६२व्या मिनिटाला संघासाठी गोल के...