भारत, नोव्हेंबर 25 -- फिफा विश्वचषक २०२२ हा आतापर्यंतच्या चढ-उतारांचा विश्वचषक राहिला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत दोन मोठे अपसेट झाले आहेत. विशेष म्हणजे दोन्ही अपसेट आशियाई संघांनी केले आहेत. प्रथम सौदी अरेबियाने अर्जेंटिनाचा पराभव करून सर्वांनाच चकित केले. यानंतर जपानने जर्मनीवर ऐतिहासिक विजय नोंदवला. जपान हाफ टाईमपर्यंत ०-१ ने पिछाडीवर होता. मात्र, त्यानंतर त्यांनी बलाढ्य जर्मनीला २-१ ने पराभूत करून इतिहास रचला.

२३ नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यात जपानच्या खेळाडूंनी प्रथम आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकली, त्यानंतर जपानच्या चाहत्यांनी आपल्या चांगल्या सवयींनी संपूर्ण जगाला वेड लावले. सामना संपल्यानंतर सर्व चाहते स्टेडियममधून बाहेर पडले, पण जपानी चाहते मात्र मैदानातच थांबले. त्यांनी निळ्या कचऱ्याच्या पिशव्या काढल्या आणि त्यात पाण्याच्या र...