भारत, नोव्हेंबर 29 -- फिफा वर्ल्डकपमध्ये अर्जेंटिनाने मेक्सिकोचा पराभव केला. या सामन्यात अर्जेंटिनाचा सुपरस्टार लिओनेल मेस्सीने निर्णायक गोल केला. या विजयानंतर मेस्सी एका नव्या वादात सापडला आहे. मेक्सिकोवरील विजयानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी प्रचंड जल्लोष केला. या जल्लोषादरम्यान मेक्सिको संघाची जर्सी मेस्सीच्या पायाजवळ पडलेली दिसली. यादरम्यानचा फोटो व्हायरल झाला आहे.

कॅनेलो अल्वारेझनं दिली मेस्सीला धमकी

यानंतर मेक्सिकोच्या समर्थकांनी मेस्सीवर निशाणा साधला आहे. तसेच, मेक्सिकन बॉक्सर कॅनेलो अल्वारेझने मेस्सीला धमकी दिली आहे. अल्वारेझने ट्विटरवर लिहिले की, मेस्सी मेक्सिकन जर्सीच्या साह्याने फरशी साफ करत आहे. हे मेक्सिकन लोकांचा अनादर करणारे आहे. यापुढे मेस्सी माझ्यासमोर दिसू नये, यासाठी देवाकडे प्रार्थना करा. मी अर्जेंटिनाचा जसा आदर करतो ...