भारत, नोव्हेंबर 29 -- कतार विश्वचषकात सध्या ग्रुप स्टेजचे सामने सुरू आहेत. सोमवारपर्यंत (२८ नोव्हेंबर) सर्व संघांचे प्रत्येकी दोन सामने झाले आहेत. आतापर्यंत गतविजेता फ्रान्स, पाच वेळचा चॅम्पियन ब्राझील आणि अनुभवी ख्रिस्तियानो रोनाल्डोचा संघ पोर्तुगाल हे पुढच्या फेरीत पोहोचले आहेत. तर, यजमान कतार बाहेर पडला आहे. मात्र अजूनही उरलेल्या २८ संघांना राऊंड ऑफ १६ फेरीत प्रवेश करण्याची संधी आहे.

ग्रुप स्टेजमधील सर्व संघांचे आपापले शेवटचे सामने २९ नोव्हेंबरपासून सुरू होतील. आतापर्यंत दिवसांत ४ सामने वेगवेगळ्या वेळी खेळवण्यात आले, पण आता तसे होणार नाही. आता एका गटातील दोन सामने एकाच वेळी होणार आहेत. भारतीय वेळेनुसार दर दिवशी एका ग्रुपमधील २ दोन सामने होतील. हे सामने रात्री साडेआठपासून सुरू होतील. त्याचवेळी आणखी एका गटातील २ सामने एकाच वेळी १२:३० वा...