Mumbai, ऑक्टोबर 4 -- Fasting Mistakes That Cause Weight Gain: नवरात्रीच्या नऊ दिवसांत अनेक जण उपवास करतात. यामुळे पूजेबरोबरच वजन कमी होण्यासही मदत होईल, असे त्यांना वाटते. पण उपवासाच्या वेळी खाण्या-पिण्याच्या केलेल्या अशा चुकांमुळे वजन कमी होण्याऐवजी वेगाने वाढते आणि अवघ्या ९ दिवसांत भरपूर वजन वाढते. उपवास करून वजन कमी करायचं असेल तर या चुका अजिबात करू नका. जाणून घ्या उपवास दरम्यान कोणत्या उपवासाच्या चुका टाळणे आवश्यक आहे.

उपवासात तुम्ही हेल्दी फूड खाता, पण जर तुम्ही जेवणाच्या प्रमाणात काळजी घेतली नाही तर वजन झपाट्याने वाढेल. उदाहरणार्थ लोक एकसोबत ड्रायफ्रूट्स जास्त प्रमाणात खायला सुरवात करतात. ज्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागते. त्यामुळे जर तुम्ही उपवासादरम्यान ड्रायफ्रूट्स, नट्स वगैरे खात असाल तर त्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा. श...