भारत, जून 19 -- Fastag Annual Pass: केंद्र सरकारने फास्टॅग आधारित वार्षिक पास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पास प्रणालीची घोषणा केली. या पासमुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांवरील आर्थिक बोजा कमी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर हा पास घेणे बंधनकारक राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. जाणून घ्या संपूर्ण तपशील.

काय आहे वार्षिक FASTag पास

या पासची किंमत तीन हजार रुपये असेल, अशी माहिती गडकरी यांनी दिली आहे. १५ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होणार असून, त्यामुळे महामार्गांवर विनाअडथळा प्रवास करणे शक्य होणार आहे. पास सुरू झाल्याच्या तारखेपासून हा पास एक वर्ष किंवा २०० प्रवासांसाठी (जे आधी असेल) वैध आहे.

किती होईल बचत

१ ट्रिप म्हणजे १ टोल क्रॉसिंग म्हणजेच प्रवासी एक बाजू पार...