Delhi, फेब्रुवारी 12 -- farmer protest delhi : शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या 'दिल्ली चलो' मोर्चाच्या आधी, हरियाणा आणि दिल्ली सीमा बंद करण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी काँक्रीटचे अडथळे, लोखंडी बॅरिकेट, काटेरी तारांचे कुंपण उभारण्यात आले आहे. याशिवाय जमावबंदी कायदा लागू करण्यात आला असून हजारो पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. एकीकडे, केंद्राने शेतकरी संघटनांना त्यांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी दुसऱ्या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षांनी रविवारी आंदोलकांना राजधानी दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी सीमेवर हजारो पोलिसांची कुमक तैनात केली आहे.

उद्या मंगळवारी १३ फेब्रुवारी शेतकऱ्यांचे वादळ दिल्लीकडे कूच करणार आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सर्व सीमा ...