भारत, जानेवारी 27 -- बॉलिवूडची प्रसिद्ध डायरेक्टर आणि कोरिओग्राफर फराह खान ही फूडी म्हणून ओळखली जाते. घरी विविध खाद्यपदार्थ बनवण्याची आणि मित्रांना खाऊ घालण्याची तिला आवड आहे. याविषयीचे अनेक व्हिडिओ ती सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता फराह खान विविध पंचपक्वान शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे बनवावे याचे धडे घेणार आहे. यावेळी ती एकटी नाहीए, तर भारतातील प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ तिच्यासोबत परीक्षक म्हणून असणार आहे. विकास खन्ना, रणवीर बरार, तेजस्वी प्रकाश, गौरव खन्ना यासारखे भारतातील प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ यांच्यासोबत ती खाद्यपदार्थांची सफर घडवून आणणार आहे. फराह खानचा पाककलेचा हा नवा शो आज रात्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

'सेलिब्रिटी मास्टरशेफ इंडिया'चे (Celebrity Masterchef India) सोमवार, २७ जानेवारीपासून रात्री ८ वाजल्यापासून सोनी ...