Delhi, फेब्रुवारी 6 -- Fact Check : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानंतर अमेरिकेतून बेकायदा स्थलांतरितांना बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरूच आहे. अमेरिकेच्या लष्करी विमानातून तब्बल १०४ भारतीयांना बुधवारी पंजाबमधील अमृतसरमध्ये आणण्यात आले. या भारतीयांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोसह काही अफवादेखील पसरल्या असून ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, या परत आलेल्या या भारतीयांना अमेरिकेतून बेड्या घालून परत पाठवण्यात आलं आहे.

व्हायरल झालेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये असा दावा केला जात आहे की, भारतीयांना हातात आणि पायांना बेड्या बांधून पाठवण्यात आलं आहे. एका पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, २०० हून अधिक भारतीयांना अमानुष पद्धतीने अमेरिकेतून काढून टाकण्यात आलं आहे. त्यांच्या हाताला बेड्या बांधण्यात आल्या होत्या तर पाय...