Mumbai, फेब्रुवारी 5 -- Nora Fatehi Accident Death : बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि 'डान्सिंग क्वीन' नोरा फतेही तिच्या खास स्टाईल आणि फॅशनसाठी ओळखली जाते. नोरा फतेही सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. तिचे डान्सिंग व्हिडिओ आणि फॅशन व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडतात. पण, आता अभिनेत्री एका भलत्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री नोरा फतेहीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिच्या निधनाची बातमी देण्यात आली असून, हा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत आहे. नोरा फतेही हीच्या अपघाताचा हा व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांसह नेटकऱ्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी लाखोंनी कमेंट्स करण्यास सुरुवात केली आहे. पण, या व्हिडिओचं सत्य काय आहे?

सध्या सोशल मिडियावर नोरा फतेहीचा अपघातात मृत्यू झाल्याची अफवा जोरदार पसरत आहे. मात्र...