Mumbai, मे 3 -- Sharad Pawar and Uddhav Thackeray Viral Video: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्ता जितेन गजारिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांचा एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये शरद पवार उद्धव ठाकरेंना बाहेर थांबण्यास सांगतात. शरद पवारांच्या आवाहनावर उद्धव ठाकरे हात जोडून "ठीक आहे, मी आजूबाजूला आहे", असे बोलताना दिसत आहेत. मात्र, या व्हिडिओचा वेगळाच अर्थ लावण्यात येत आहे. शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर काढले, असे अनेकजण दावा केला जात आहे. मात्र, या व्हिडिओमागील सत्य समोर आले.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या व्हिडिओमागील सत्य समोर आले. फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार काही कारणास्तव उद्धव ठाकरे यांना बाहेर थांबण्याची विनंती करत...