Mumbai, जानेवारी 28 -- Mona Lisa Viral News: महाकुंभात मोती आणि रुद्राक्ष माळा विकण्यासाठी गेलेली मोनालिसा आपल्या सौंदर्यामुळे रातोरात चर्चेत आली. मोनालिसाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, मोनालिसाने अवघ्या १० दिवसांत १० कोटी रुपयांची कमाई केली, असा दावा करणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यावर मोनालिसाने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मोनालिसाने महाकुंभात मोती आणि रुद्राक्ष माळा विकून एवढी मोठी संपत्ती जमवल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे. मात्र, मोनालिसाने हे दावे फेटाळून लावले आहेत. ती म्हणाली की, 'जर मी इतके पैसे कमावले असते तर, मग मी येथे का राहिले असते आणि माळा का विकल्या असत्या?'

मोनालिसाच्या प्रसिद्धीमुळे तिच्या व्यवसायात भर पडली असावी, असे अनेकांना वाटत असेल. पं...