Mumbai, जानेवारी 31 -- Government Scheme: इंटरनेटवरून माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात काही वेळा चुकीचे अपडेट्स मिळण्याचा धोका असतो. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारी योजनेच्या नावाखाली लोकांमध्ये चुकीची माहिती पसरवली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. केंद्र सरकार प्रत्येक घरातील एका सदस्याला नोकरी देणार, असा दावा एका पोस्टच्या माध्यमातून केला जात आहे. ही माहिती पूर्णपणे खोटी असून नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांना बळी पडू नये, अन्यथा त्यांची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियावर युट्यूबच्या एका चॅनेलच्या थंबनेलचा फोटो व्हायरल होत आहे, ज्यात असे लिहिले आहे की, संपूर्ण भारतीयांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकार एक परिवार एक नोकरी योजनेंतर्गत प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी देत आहेे. या नोकरीमध्ये निरक्षर असलेल्...