Mumbai, फेब्रुवारी 4 -- Weather Updates: देशातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होताना दिसत आहे. अनेक भागात दुपारी उन्हाचा चटका आणि रात्री थंडी जाणवत आहे. तर, अधूनमधून पावसाच्या सरी देखील पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक युट्यूब व्हिडिओ व्हायरल होत आहे. या यूट्यूब व्हिडिओच्या थंबनेलमध्ये दावा करण्यात आला आहे की, देशातील २१ राज्यांमध्ये मोठे वादळ येणार आहे. तसेच लोकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. हे पाहून लोक हैराण आणि अस्वस्थ झाले आहेत. इंटरनेट वापरकर्त्यांकडून प्रश्न विचारला जात आहे की, खरंच वादळ येणार आहे का? अचानक झालेल्या पावसाचा परिणाम होणार आहे का? फॅक्ट चेकच्या माध्यमातून सत्य जाणून घेऊयात.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या यूट्यूब व्हिडिओच्या थंबनेलमध्ये हवामानाशी संबंधित एक ध...