भारत, फेब्रुवारी 28 -- गेल्या दशकभरात भारतातून होणाऱ्या निर्यातीत विक्रमी वाढ झाली असून ऐतिहासिक उच्चांकी पातळीला पोचली आहे. पुढील दशकातही हा वेग टिकून राहण्याची चिन्हे आहेत. भारतात व विशेषतः महाराष्ट्रात निर्य़ातीस अनुकूल अशा महत्त्वाच्या घडामोडी घडत असून त्या संधींचा फायदा मराठी व्यावसायिक व उद्योजकांनी वेळीच घ्यावा, असे आवाहन दुबईस्थित 'अदील ग्रुप ऑफ सुपर स्टोअर्स'चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी नुकतेच मुंबईत एका कार्यक्रमात केले.

'मिती ग्रुप'तर्फे आयोजित 'महाराष्ट्र बिझनेस एन्क्लेव्ह २०२५' परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. माटुंग्यातील 'वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट'मध्ये झालेल्या या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील नामवंत तसेच नवउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते....