Mumbai, जानेवारी 28 -- Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या १ फेब्रुवारी रोजी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थसंकल्पाशी संबंधित काही प्रमुख संज्ञा व संकल्पना समजून घेणं आवश्यक आहे. त्यापैकीच एक आहे वित्तीय तूट.

वित्तीय तूट हा सरकारच्या आर्थिक आरोग्याचं मोजमाप करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. वित्तीय तूट म्हणजे सरकारचा एकूण महसूल आणि एकूण खर्च यांच्यातील तफावत. सोप्या शब्दांत सांगायचं तर खर्च भागवण्यासाठी सरकारी उत्पन्न पुरेसं नसल्यास बाहेरून जितका पैसा कर्ज म्हणून घ्यावा लागतो तो आकडा म्हणजे वित्तीय तूट असते. ही संकल्पना समजून घेतल्यास देशापुढील आर्थिक आव्हानं आणि वित्तीय धोरणांची दिशा समजण्यास मदत होते.

वेगानं वाढणाऱ्या भारतीय अर्थव्यवस्थेला वाढ, चलनवाढ आणि वित्तीय जबाबदारी यां...