Mumbai, जानेवारी 28 -- ई-सॉप (Esop - Employee Stock Ownership Plan) अर्थात, कर्मचारी स्टॉक मालकी योजना ही संकल्पना स्वयंस्पष्ट आहे. कर्मचाऱ्यांना संस्थेमध्ये मालकी हक्क देण्याचा पर्याय म्हणजे ई-सॉप. हा एक प्रकारे पगाराव्यतिरिक्त मिळणारा लाभ असतो.

ई-सॉप अंतर्गत दिला जाणारा लाभ थेट शेअरच्या स्वरूपात, नफ्याचा भाग म्हणून किंवा बोनस म्हणून दिला जातो. या पर्यायांचा लाभ कोणत्या कर्मचाऱ्यांना द्यायचा हे ठरवण्याचा अधिकार कंपनी मालकाचा किंवा व्यवस्थापनाचा असतो. अर्थात, हा लाभ ऐच्छिक असतो. या योजनेअंतर्गत विशिष्ट तारखेच्या आधी ठरलेल्या किंमतीवर खरेदी करता येतात. कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ देताना कंपनी मालकाला कंपनीच्या नियमांचं पालन करावं लागतं.

ऑप्शन पीरियड (विशिष्ट कालावधी) नंतर कंपनीचे ठराविक शेअर्स खरेदी करण्यासाठी एखादी संस्था तिच्या कर्मचा...