Mumbai, फेब्रुवारी 7 -- Repo Rate Cut : रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीनं शुक्रवारी व्याजदरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात करत रेपो दर ६.२५ टक्क्यांवर आणला आहे. गेल्या पाच वर्षांत पहिल्यांदाच व्याजदरात कपात केल्यानं किरकोळ कर्जदारांचे मासिक हप्ते किंवा ईएमआय तेवढ्याच प्रमाणात कमी होणार आहेत.

रेपो रेट हा व्यावसायिक बँकांनी आरबीआयकडून घेतलेल्या कर्जावरील व्याजदर असतो. तो कमी झाल्यामुळं साहजिकच आता बँका त्यांच्या व्याजदरात कपात करू शकतात. त्याचा हजारो किरकोळ कर्जदारांना कसा लाभ होऊ शकतो, याविषयी जाणून घेऊया सविस्तर.

सध्या किरकोळ आणि लघु उद्योगांना दिली जाणारी कर्जे ही बाह्य बेंचमार्कशी (आरबीआयच्या रेपो दराशी) जोडलेली आहेत. त्यानुसार कर्जाचे व्याजदर ठरतात. तर, कॉर्पोरेट कर्जे अद्याप फंड-आधारित कर्ज दर किंवा एमसीएलआरच्या मार्जिनल कॉस्टवर आहेत.

सप...