New delhi, फेब्रुवारी 5 -- दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी गुरुवारी मतदान पार पडले. आता अनेक चॅनल्स आपले एक्झिट पोल सादर करत आहेत. प्रत्येक निवडणुकीत मतदान संपल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर येत असतात. एक्झिट पोल म्हणजे निकालापूर्वीचा अंदाज असतो, ज्यात पुढे कोण सरकार स्थापन करणार यांचा अंदाज वर्तवला जातो. २०२० च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलने आम आदमी पक्षाला बहुमत दाखवले होते. मात्र फरक फक्त जागांचा होता. त्यानंतर निकालही 'आप'च्या बाजूने लागला. यावेळी एक्झिट पोलचे अंदाज प्रत्यक्ष निकालात बदलतात की नाही हे पाहावे लागेल. अशा परिस्थितीत एक्झिट पोल काय आहेत आणि ते कितपत अचूक आहेत हे समजून घेऊया.

मतदान केल्यानंतर लगेचच मतदारसंघाचा कल जाणून घेण्यासाठी एक्झिट पोल हे मतदारांचे प्राथमिक सर्वेक्षण असते. ते अचूक नसले, तरी निवडणुकीत कोणत...