Delhi, मे 16 -- EPFO News : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) उपचार, शिक्षण, लग्न आणि घर खरेदीसाठी पैसे काढण्याची प्रक्रिया सुलभ केली आहे. यासाठी ऑटोमॅटिक क्लेम सेटलमेंटची (ऑटो-मोड सेटलमेंट) सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे तीन दिवसांत नागरिकांच्या खात्यात आता पैसे जमा होणार आहे. सध्या या प्रक्रियेला १० ते १५ दिवस लागतात.

EPFO तून आगाऊ पैसे काढण्यासाठी या आधी मोठा कालावधी लागतो. कारण ईपीएफ सदस्याची पात्रता, दाव्यासाठी सादर केलेली कागदपत्रे, केवायसी परिस्थिती, वैध बँक खाते इत्यादींची पडताळणी केली जाते. या प्रक्रियेत अनेकदा अवैध दावे हे रद्द केले जातात, किंवा नाकारले जातात. ही प्रक्रिया ऑनलिन होणार असल्याने आता या प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी होणार आहे.

या प्रक्रियेत, आगाऊ रक्कम काढण्यासाठी करण्यात आलेला दावा हा आपोआप ...