Mumbai, एप्रिल 25 -- Eknath Khadse : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रमुख पक्ष आणि आघाड्यांमध्ये जागावाटपावरून रस्सीखेच व रुसवेफुगवे सुरू आहेत. या सगळ्या धामधुमीत राज्याचे माजी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांची चर्चा अचानक सुरू झाली आहे. एकनाथ खडसे हे सध्या नेमके कोणत्या पक्षात आहेत आणि कोणत्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत याविषयी संभ्रम आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या एकनाथ खडसे यांनी दीड-दोन वर्षांपूर्वी भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीस यांचा उदय झाल्यापासून ते अडगळीत पडले होते. भूखंड घोटाळ्याच्या प्रकरणात मंत्रिपद गेलेल्या खडसे हे पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतूनच बाहेर फेकले गेले. त्यानंतर त्यांच्या चौकशा सुरू होत्या. या सगळ्याला कंटाळून त्...