Mumbai, एप्रिल 19 -- Ekagrah Rohan Murty : प्रख्यात उद्योजक व इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचा नातू एकाग्र मूर्ती हा कंपनीच्या एका निर्णयामुळं अक्षरश: मालामाल होणार आहे. एकाग्र मूर्ती याला इन्फोसिसकडून तब्बल ४.२ कोटी रुपयांचा लाभांश मिळणार आहे.

देशातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसचा २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या तिमाहीचा निकाल गुरुवारी आला. या निकालाबरोबरच कंपनीच्या संचालक मंडळानं भागधारकांना २८ रुपये लाभांश देण्याची घोषणा केली. त्यात २० रुपये अंतिम लाभांश आणि ८ रुपयांच्या विशेष लाभांशाचा समावेश आहे. या निर्णयामुळं गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

हेही वाचा: इन्फोसिसनं केली डिविडंडची घोषणा; एका शेअरमागे किती रुपये मिळणार, पाहा

नारायण मूर्ती यांच्या नातवालाही कंपनीच्या या निर्णयाचा छप्परफ...