Mumbai, एप्रिल 6 -- मुस्लिम समाजासाठी ईद-उल-फित्र हा सण खूप खास आहे. हा सण देशात तसेच परदेशातही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ईद-उल-फित्रला मीठी ईद असेही म्हणतात.

मुस्लीम समाजातील लोक रमजान महिन्यात रोजा ठेवतात आणि अल्लाहची उपासना करतात. ईद-उल-फित्रची तारीख चंद्र पाहूनच ठरवली जाते. यावर्षी १२ मार्च २०२४ पासून रमजान महिना सुरू झाला. अशा परिस्थितीत यावेळी ईद कोणत्या दिवशी साजरी होणार हे जाणून घेऊया.

Hanuman Jayanti 2024 : बजरंगबलीला हनुमान का म्हणतात? त्यामागील पौराणिक कथा जाणून घ्या

इस्लामिक कॅलेंडरच्या १०व्या शव्वालच्या पहिल्या तारखेला आणि रमजानच्या शेवटच्या दिवशी चंद्र दिसल्यानंतर ईद-उल-फित्रचा सण साजरा केला जातो. ईदची नेमकी तारीख अद्याप ठरलेली नाही. २९ वा रोजा पूर्ण झाल्यावर चंद्र दिसला तर १० एप्रिलला ईद साजरी होईल, असा अंदाज आहे....