New Delhi, जानेवारी 31 -- Arthik Pahani Ahwal : उद्या, १ फेब्रुवारी सादर होत असलेल्या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर देशाचा आर्थिक पाहणी २०२५-२६ (आर्थिक वर्ष २०२६) आज संसदेत सादर करण्यात आला. भारताचं देशांतर्गत सकल उत्पादन (GDP) ६.३ ते ६.८ टक्क्यांदरम्यान राहण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. येत्या वर्षभरात आर्थिक विकास दर मंदावण्याचे संकेत अहवालातून मिळाले आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी, सरकारी धोरणं आणि पुढील आर्थिक वर्षाचा आर्थिक दृष्टीकोन याचा सर्वंकष आढावा आर्थिक पाहणी अहवालात घेण्यात आला आहे. मुख्य आर्थिक सल्लागार (सीईए) व्ही. अनंत नागेश्वरन यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विभागाच्या आर्थिक विभागातर्फे हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

देशांतर्गत अर्थव्यवस्थेची पायाभूत तत्त्वे मजबूत आहेत, विदेशी व्यापारातील समत...