Mumbai, जानेवारी 31 -- Economic Survey : आज सकाळी ११ वाजचा संसदेचे बजेट सत्र सुरु होत आहे. सेंट्रल हाॅलमध्ये दोन्ही सभागृहाच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती दौपदी मुर्मू संबोधित करतील. यानंतर लगेचच २०२२-२३ आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाणार आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री ते सादर करतील. त्यानंतर लगेचच मुख्य आर्थिक सल्लागार वी अनंतर नागेश्वरन प्रेस काॅन्फरन्स घेणार आहेत.

आर्थिक सर्वेक्षण अहवालात काय असते

अर्थव्यवस्थेची स्थिती देण्यासाठी आणि धोरणांसंदर्भात उपाययोजना सुचवण्यासाठी बजेटच्या आधी संसदेत आर्थिक समिक्षा सादर केली जाते. आर्थिक सर्वेक्षणात अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण स्थितीचा आढावा घेतला जातो. याद्वारे सरकार योजनांची स्थिती, संपूर्ण वर्षभरातील विकासाचा कल, कोणत्या क्षेत्रात किती गुंतवणूक झाली याची माहिती दिली जाते. बजे...