Mumbai, एप्रिल 14 -- Dr Ambedkar Jayanti 2025 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्यकर्तृत्व सूर्यासारखे प्रखर आणि तेजस्वी आहे. अफाट ज्ञान, मेहनत आणि संघर्षाच्या बळावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे शिल्पकार बनले. १४ एप्रिल हा डॉ. बाबासाहेबांचा जन्मदिवस. १८९१ साली महू येथे त्यांचा जन्म झाला. गौतम बुद्ध, कबीर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सारख्या महान विभूतींचे विचार आत्मसात करून सामाजिक क्रांतीचे प्रणेते बनलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म युग व काळाचा प्रवाह उलट दिशेला बळवण्यासाठी झाला होता. त्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व समजण्यासाठी एखाद्या विद्वानालाही वर्षोनुवर्षो लागू शकतात. कारण त्यांच्या व्यक्तीमत्वाचा थांग लागणे अवघड काम आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पाकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आप...