Mumbai, जानेवारी 29 -- Don 3 Villain Character : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहची 'डॉन ३'साठी निवड झाली, तेव्हा चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या फ्रँचायझीच्या सिक्वेलची चाहते बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होते. यानंतर या चित्रपटात व्हिलन अर्थात खलनायक कोण सकरणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतुर झाले होते. पण, जेव्हा या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा रणवीर सिंह आता यात शाहरुख खानची भूमिका साकारणार असल्याचे समोर आले होते. २ वर्षांपूर्वी या प्रोजेक्टची घोषणा झाली होती, पण या चित्रपटाचं काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. पण आता प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अंतिम चित्रपटाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे, जे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढवणार आहे.

'डॉन ३'मध्ये खलनायकाची भूमिका कोण साकारणार हे निर्मात्यांनी निश्चित केले आहे. एका रिपोर्टनुसार,...