Dombivli, फेब्रुवारी 24 -- Dombivli News: इन्स्टाग्राम रील बनवताना एका २५ वर्षीय तरुणाने डोंबिवली पश्चिमेकडील माणकोली पुलाजवळील खाडीत उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच विष्णूनगर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधमोहीम सुरू केली. ही घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली.

रोहित अशोक मोरया (वय, २५) असे खाडीत उडी मारलेल्या तरुणाचे नाव आहे. रोहित हा भिवंडीतील साईनगर येथील गायत्री मंदिरासमोरील कामतघर येथे वास्तव्यास आहे. रोहित हा शुक्रवारी दुपारी मित्रासोबत रील पकडण्यासाठी माणकोली पुलावर गेला. मित्रासोबत एक रील तयार केल्यानंतर दुसऱ्या रीलवर काम करत असताना त्याने अचानक पुलावरून खाडीत उडी मारली.

विष्णूनगर पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, एका ग्रामस्थाकडून माहिती मिळताच आम्ही अग्निशमन दलासह घटनास्थळी पोहोचलो आणि खाडीत तरुणाचा शोध सुरू केला. ...