Dombivli, मे 23 -- Dombivli MIDC Blast : डोंबिवली पूर्वच्या सोनारपाडा येथील एका केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत ६ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. आगीचे प्रचंड लोळ दूरवरून दिसत असल्याने परिसरात घबराहट पसरली आहे. गुरुवारीदुपारी१ वाजून ४० मिनिटांनी ही आग लागली. अंबर केमिकल कंपनी,मेट्रो कंपनी जवळ,एम.आय.डी.सी. फेज- ०२, सोनारपाडा,डोंबिवली (पूर्व) या कंपनीत हा स्फोट झाल्यानंतर भीषण आह लागली.

या स्फोटाने ३ ते ४ किलोमीटर परिसरातील इमारतींचे नुकसान झाले असून अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. या दुर्घटनेनंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देवून परिस्थितीचा आढावा घेतला.यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, डोंबिवलीतील केमिकल कंपन्या दुसरीकडे स्थलांतरित केल्या जातील. (chemical companies in dombivli to s...