Dombivli, मे 23 -- Dombivli Blast News : डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसीमधील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट (Dombivli MIDC Blast) झाला. हा स्फोट इतका भीषण होता की,डोंबिवली व आजूबाजूच्या परिसराला भूकंपासारखे हादरे बसले. हवेत धुराचे लोळ लांबवरून दिसत होते. ३ ते ४ किलोमीटर परिसरातील रहिवाशी इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. तसेच बॉयलरच्या स्फोटाचा आवाज ४ किलोमीटरच्या परिसरात ऐकू आला. या कंपनीच्या जवळ असलेले हुदांई गाड्यांचे शोरूम जळाले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्याअसून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये २ महिलांचा समावेश आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवी...