Mumbai, मे 24 -- Dombivli MIDC Fire: डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरातील एका केमिकल फॅक्टरीत बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या भीषण स्फोटात अकरा जण ठार आणि जवळपास ५० जण जखमी झाले. ठाणे जिल्ह्यात असलेल्या या कारखान्यात झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईजवळील डोंबिवली एमआयडीसीत आग लागल्याची माहिती दिली. या आगीत अनेकांचा मृत्यू झाला आणि जवळपास ५० जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि टीडीआरएफची पथके मिळून आग आटोक्यात आणण्याचे काम करत असून आग आणखी पसरू नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले.

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF च्या तीन जवानांना जलसमाधी, बोट उलटतानाचा लाईव्ह VIDEO आला समोर

डोंबिवली एमआयडीसी परिसरातील फेज २ मधील अंबर केमिकल कंपनीत हा स्फोट झाला. नागरी संरक्...