Mumbai, फेब्रुवारी 3 -- Exchange Rate News : डॉलरच्या तुलनेत रुपया ५४ पैशांच्या मोठ्या घसरणीसह आज ८७.१६ च्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. डॉलरच्या पुढे रुपया घसरला आहे. जाणकारांच्या मते, येत्या ६ ते १० महिन्यांत डॉलरच्या तुलनेत रुपया ९० वरून ९२ पर्यंत खाली येऊ शकतो.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील सर्वात मोठ्या व्यापारी भागीदारांवर कर लादल्यानंतर अमेरिकी डॉलरमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर आशियाई चलनात घसरण झाल्याने सोमवारी भारतीय रुपया विक्रमी नीचांकी पातळीवर उघडला. त्याने प्रथमच ८७ चा टप्पा ओलांडला. डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकन आणि बहुतेक कॅनेडियन आयातीवर २५% आणि चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर १०% शुल्क लादले आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपया 0.5 टक्क्यांनी घसरून 87.07 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. काही वेळाने तो ...