Mumbai, फेब्रुवारी 12 -- Share Market News : हिरो मोटोकॉर्प लिमिटेडचे शेअर्स बुधवारी ट्रेडिंगदरम्यान चर्चेत होते. आज कंपनी खास डिव्हिडंड देत आहे. हिरो मोटोकॉर्प लिमिटेडचे समभाग बुधवारी एक्स-डिव्हिडंडवर व्यवहार करत आहेत.

दुचाकी कंपनीच्या संचालक मंडळानं ३१ डिसेंबर २०२४ रोजी संपलेल्या कालावधीच्या तिमाही निकालांसह कंपनीच्या पात्र भागधारकांना प्रति शेअर ५,००० टक्के म्हणजेच १०० रुपये इतका भरघोस लाभांश जाहीर केला होता. आज कंपनीचा शेअर २.१५ टक्क्यांनी घसरून ३९९७ रुपयांवर व्यवहार करत आहे.

२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी प्रत्येकी १०० रुपये प्रति इक्विटी समभाग अंकित मूल्य असेल, असं कंपनीने एक्सचेंज फायलिंगमध्ये म्हटलं आहे. त्यानुसार कंपनीच्या संचालक मंडळानं अंतरिम लाभांश देण्याच्या उद्देशानं सभासदांची पात्रता ठरविण्यासाठी १२ फेब्रुवारी २०२५ ही रेकॉर्...