Mumbai, फेब्रुवारी 6 -- Share Market : डिसेंबर तिमाहीच्या मजबूत निकालानंतर कमिन्स इंडियाच्या शेअरमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. आज सलग तिसऱ्या सत्रात कमिन्स इंडियाच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. या कालावधीत शेअर १४ टक्क्यांनी वधारला. या सगळ्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या संचालक मंडळानं गुंतवणूकदारांना लाभांशाची (Dividend) भेट दिली आहे.

कमिन्स इंडियाच्या संचालक मंडळानं २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी २,७७,२००,००० इक्विटी शेअर्सवर (अंकित मूल्य प्रत्येकी २/- रुपये) प्रति इक्विटी शेअर १८ रुपये म्हणजेच ९०० टक्के अंतरिम लाभांश मंजूर करून जाहीर केला आहे. या अंतरिम लाभांशासाठी सभासदांची पात्रता निश्चित करण्यासाठी कंपनीनं शुक्रवार, १४ फेब्रुवारी २०२५ ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. अंतरिम लाभांश ३ मार्च २०२५ पर्यंत दिला जाईल.

कमिन्स इंडियाच...